मुख्यमंत्र्यांचं प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण !

मुख्यमंत्र्यांचं प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण !

मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्याची जोरदार मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर कर हे आमपल्या मागणीवर ठाम राहणार की आंदोलन मागे घेणार पाहणं गरजेचं आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून संभाजी भिडेंवर कारवाई करत नाहीत ते काय तुमचे जावई आहेत का असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात पुरावे नाहीत असं सरकारचं म्हणणं असेल तर एफआयआरमध्ये त्यांचं नाव का घेतलं?  तसेच ते दोषी आहेत की नाही, हे न्यायालय ठरवेल, तुम्ही त्यांना कोर्टात हजर करण्याऐवजी जावयासारखी वागणूक का देताय?, असा असा सवालही प्रकास आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो अनुयायी मुंबईत धडकणार असून या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भायखळा येथून एल्गार मोर्चा निघणार होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ सर्व कार्यकर्ते जमले आहेत. पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांना अटक केली असली तरी संभाजी भिडे यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आज मुंबईत एल्गार मोर्चा काढण्यात आला असून राज्यभरातून लोक मोर्चासाठी मुंबईत पोहोचले आहेत.

 

COMMENTS