चौकशीनंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणं म्हणजे गुन्हा – प्रकाश आंबेडकर

चौकशीनंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणं म्हणजे गुन्हा – प्रकाश आंबेडकर

पुणे – बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांना तुरुंगात ठेवणं म्हणजे गुन्हा असल्याचं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या चौकशीतून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा गुन्हा असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ यांना चौकशीसाठी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले नसून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी, यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयाकडे वेळ मागितला होता. मात्र, चौकशीत छगन भुजबळ यांच्याविरोधात ठोस पुरावा पुढे आला नाही. तरी देखील, भुजबळ यांना तुरुंगात ठेवणे हा गुन्हाच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु चौकशी होऊनही ते दोषी आढळले नसल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवणं योग्य नसल्याचं ते म्हणाले आहेत. धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यावर निर्णय झाला नसल्यामुळे त्या विरोधात २० मे रोजी पंढरपूरमध्ये भव्य परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडणार असल्याचही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS