पाटणा – उत्तर प्रदेशमधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर झालेल्या अत्याचारावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून यावरून असं स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.
महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे. या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नसून मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शासन करा असंही ते म्हणाले आहेत.
COMMENTS