…त्यामुळे काँग्रेससोबतची चर्चा पुढे जात नाही – प्रकाश आंबेडकर

…त्यामुळे काँग्रेससोबतची चर्चा पुढे जात नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबई – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच काँग्रेससोबत आघाडी करण्यातबाबतही आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही अद्याप ही तयार आहोत. मात्र महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्लीमधून काही सूचनाच नाहीत त्यामुळे चर्चा पुढे जात नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

तसेच आर्मीमध्ये अनेक रेजिमेंट असतात, सरकारने एक रेजिमेंटचा सत्कार करणं उचित नाही. याधी अस झालं नाही. भारतीय सैन्य एक असतं, भाजप सरकारने कार्यक्रम करून छेद केला आहे. रिटायर्ड लोकांचा सत्कार हा नैतिकतेला धरून नाही.  सैन्याचे राजकीयकरण सुरू आहे.भीमा कोरेगाव लढाईत महार सैनिकांबरोबर इतर सैनिक होते. राजकारणाशीवाय हे दुसर काही नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राफेलबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. किंमतीबाबत अजून शंका आहे. सुप्रीम कोर्ट म्हणत असेल की हे विमान अत्याधुनिक आहे. असं योग्य आहे पण हे जेव्हा वापरायला पाहिजे तेव्हा मिळालं नाही तर याचा फायदा नाही.मिराज 2000 आपण आधी विकत घेतलं आहे, यात आधुनिक बदल केले जात आहेत.निगोशनबाबत अजून शंका आहे, मोदी आणि शहाने देशातील जनतेला समजून सांगावं. तसेच लाईफ सायकल कॉस्ट फायटर या ने पहिलं ऐग्रीमेंट झालं होतं. कोर्टाने असा निर्णय देऊन विश्वासार्हता कमी केली असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली आहे.

तसेच राफेल प्रकरणात लोकसभा निवडणुकीच्या आधी कैग मार्फत चौकशी करून रिपोर्ट आला पाहिजे अशी मागणी करत आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व बाजू समजून घेतली पाहिजे अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

 

COMMENTS