महाआघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, काँग्रेसला दिला ‘हा’ फॉर्म्यूला !

महाआघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, काँग्रेसला दिला ‘हा’ फॉर्म्यूला !

मुंबई – महाआघाडीबाबत पुन्हा एकदा भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसबरोबर दोन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये आम्ही 12 जागात्यांच्याकडे मागितल्या असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच 2004 पासून काँग्रेसने सलग हरलेल्या 22 जागांपैकी 12 जागा आम्ही मागतोय. यातील 12 जागा कोणत्या त्या काँग्रेसने ठरवावे असे आम्ही सांगितले आहे. माणिकराव ठाकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हा फॉर्म्युला आम्ही काँग्रेसला दिला आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांशी बोलून कळवतो एवढेच काँग्रेसने त्या बैठकीत सांगितले होते. परंतु याबाबत अद्याप काँग्रेसकडून कोणताही निरोप आलेला नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

दरम्यान आम्ही कुठे वेगळी आघाडी केली आहे. मी काँग्रेसला म्हणत आहे एकत्र बसून चर्चा करू. मात्र काँग्रेसच चर्चेला येत नाही.आम्ही काँग्रेसला सांगितले की चर्चेला यायचे आहे. दोन महिने आम्ही वाट बघत होतो, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही एमआयएमबरोबर आघाडी केली, ती तुटणार नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

तसेच राफेलबाबत राहुल गांधी यांनी चोरी झाली असं म्हटलं होतं. पवारांनी राहुल गांधी यांना खोटं ठरवलं आता काँग्रेसने ठरवावं पवारांबरोबर आघाडी करायची की नाही. मी असतो तर अशा स्थितीत आघाडी केली नसती असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS