मुंबई – प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहूजन महासंघ आणि एमआयएम आगामी निवडणुकांसाठी एकत्रित आले आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आपण युती करु शकत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेससाठी मात्र दरवाजे उघडे असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं असून शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही.2014 ला निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. तेव्हा राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भिडेंची पिलावळ राष्ट्रवादी मध्ये आहेत. उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार ? असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे. तसेच काँग्रेसबरोबर आम्हाला युती करायची आहे आम्ही तयार आहोत, काँग्रेसचा मित्रांबरोबर नसल्याचंही यावेळी आंबेडकरांनी म्हटलं आहे.तसेच काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला तर एमआयएमबरोबर युती करणार, निवडणूक लढवणार, आता मागे फिरणार नसल्याचंही ते म्हणालेत. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत. परंतु आम्हाला राष्ट्रवादीसोबत जाण्यात मंजूर नाही. तसेच राष्ट्रवादी, भाजपबरोबर जाणार नाही याची खात्री त्यांनी काँग्रेसला द्यावी मग आम्ही बघू असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS