आरएसएसच्या पुजेला नाही तर शस्त्रांना विरोध आहे – प्रकाश आंबेडकर

आरएसएसच्या पुजेला नाही तर शस्त्रांना विरोध आहे – प्रकाश आंबेडकर

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दस-याला शस्त्र पूजा करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबत भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. आमचा पूजेला विरोध नाही, तर या शस्त्रांना विरोध असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच संघाकडे जी शस्त्र आहेत ती पोलीस अथवा निम लष्करी दलाकडेही नाहीत. या शस्त्रांची लायसन्सही नाहीत. पोलिसांनी ही शस्त्र जप्त केली पाहिजेत. ती कुणाच्या नावावर आहेत, त्याची लायसन्स तपासली पाहिजेत. तसेच ती बेकायदेशीर आहेत का हे पोलीसांनी स्पष्ट केलं पाहिजे अशी मागणी प्रकाश आबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीसांनी कारवाई केली पाहिजे. नागपूर पोलीस आयुक्त कारवाई करत नसतील तर सरकारने त्यांना बडतर्फ करावं. तसेच पोलीसांनी हत्यारं जप्त करायला हवी होती, ती केली नाहीत. सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच माओवाद्यांविरोधात जी कारवाई केली जाते ती केली पाहिजे. आमचा विरोध पूजेला नाही, तर शस्त्र बाळगून धमकावण्याचा प्रयत्न केला जातो त्याला आहे. त्यामुळे सरकारनं जर कारवाई केली नाही तर आम्ही ऑक्टोबरला या विषयावर मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

 

COMMENTS