मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझे कधीच संबंध नव्हते. हा माझा अंतिम खुलासा आहे, यापुढे पवार काही बोललो तरी मी खुलासा करणार नसल्याचं वक्तव्य भारिप बहूजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. शरद पवार यांनी एक आरोप केला होता, मी खासदार झालो ते त्यांच्या पाठिंब्याने झालो होती. शरद पवारांनी एवढे खोटे बोलू नये. 1997-98 साली काँग्रेसबरोबर समझोता झाला, तो तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याबरोबर झाला होता, त्यात माझ्या पक्षाला चार जागा देण्याचा निर्णय झाला होता त्यात शरद पवार कुठेही नव्हते असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.
दरम्यान त्यावेळी मला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांचा निरोप आला पवारांना मला भेटायचे नाही. तसेच पवार मला भेटायला घरी आले तेव्हा पवारांनी मला आघाडीत सामील करा असे सांगितले. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितले की माझा समझोता काँग्रेसबरोबर झाला आहे. तुम्ही काँग्रेसशी चर्चा करा. 1999 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी वेगळा पक्ष झाल्यानंतर जी निवडणूक झाली त्यात पवारांच्या पक्षाने माझ्याविरुद्ध उमेदवार दिला होता असंही स्पष्टीकर प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.
COMMENTS