शरद पवारांनी राहुल गांधींचा अपमान केला – प्रकाश आंबेडकर

शरद पवारांनी राहुल गांधींचा अपमान केला – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – भारिप बहूजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार एका मुलाखतीत म्हणतात मोदी चांगला माणूस आणि काँग्रेसवाले म्हणतात राष्ट्रवादीचा विचार घेऊन सांगतो, की वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे की नाही. त्यामुळे शरद पवारांनी राहुल गांधींचा अपमान केला असून काँग्रेसवाल्यांचा निर्लज्जपणा बघायचाय की ते राष्ट्रवादीसोबत जातात की नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा मोर्चामुळे मराठा, ओबीसी, मराठा-सेड्युलकास्ट यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने टाकलेली ५० टक्क्याची अट ७० टक्क्यावर घेऊन जावी लागेल असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. २०१४ मध्ये मोदी आणि भाजपला सत्तेत आणण्यासाठी तुम्ही व्यापाऱ्यांनी किती पैसे दिले आधी ते सांगा? असा सवाल आंबेडकर यांनी औषध विक्रेत्या व्यापाऱ्यांना केला आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी सत्तेत बसवले त्यांना संपवण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. तसेच आपला व्यापार टिकवायचा असेल तर आरएसएस, बीजेपीला पैसे देणे बंद करा. किरकोळ बाजारपेठ परदेशी व्यापाऱ्यांना खुली होऊ देणार नसल्याचा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत दिला आहे. तसेच परदेशी व्यापारी देशात आला तर देशाच्या नाड्या त्याच्या हाती जातात असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS