प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर केलेल्या टिकेबाबत मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया !

प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजेंवर केलेल्या टिकेबाबत मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया !

पुणे – मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. उदयनराजेंना भाजपने खासदार कसं बनवलं असा मला प्रश्न पडला आहे. दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा असल्याचे माझ्या वाचनात नाही. एक राजा तर बिनडोक आहे. संभाजी राजे इतर विषयात जास्त लक्ष देतात अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या टिकेबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही टीका निंदनीय असल्याचे आणि अशा प्रकारची टीका कदापी सहन करणार नसल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाला पाठिंबा दिला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी संपर्क साधला आणि १० तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली.त्यामुळे १० तारखेच्या बंदला आमचा पाठिंबा असल्याचे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.  तसेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS