मुंबई – माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपात ओबीसी नेत्यांवर अन्यायाची मालिका सुरू आहे.भाजपनं सर्वाधिक त्रास दिवंगत गाेपीनाथ मुंडेंना दिला.त्यांना दाेनदा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांच्या पाठिशी ठाम राहिलाे आहे. भाजपमध्ये हाेताे, पण त्यांनी माझं तिकीट कापलं. आम्ही या निवडणुकीत सेनेच्या पाठिशी राहिलाे. नाथाभाऊंच्या घरी आम्ही गेलाे. त्यांचा अपमान भाजपनं केला. तसंच पंकजाताईंची घुसमट आपण पाहिली आहे. लाेकनेत्याच्या मुलीला ७ व्या क्रमांकाचे मंत्रीपद आणि काहीच पात्रता नसलेल्या चंद्रकांत पाटील यांना दाेन नंबरचे पद का ? असा सवालही पत्रकार परिषदेत शेंडगे यांनी केला आहे.
तसेच भाजपमधील सर्व बहुजन समाजातील नेत्यांवर अन्याय झाला आहे. मुंडे साहेबांपासून गणेश हाकेपर्यंत अन्याय केला. बाळासाहेब सानप यांचे तिकीट का कापले ?, राज्यातील आेबीसी समाज अस्वस्थ आहे. त्यामुळं भाजपमधील अनेक आेबीसी कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत.
भाजपमध्ये आेबीसी नेत्यांचे खच्चीकरण सुरू आहे, त्यांचे राजकारण संपवण्याचे काम करत आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहाेत. आम्ही पर्याय देण्याचा प्रयत्न करू. आेबीसींचा नवा पक्ष आम्ही काढू व पर्याय देवू असंही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. तसेच आम्ही भाजपमध्ये जाण्यापूर्वी भाजपची काय अवस्था हाेती ? नाथाभाऊंना भेटल्यामुळं त्यांना मिर्ची लागली. सर्व आेबीसी बाहेर पडले तर भाजप केवळ २-४ आमदारांपुरता मर्यादित राहिल असंही शेंडगे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS