8 सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात निकराची लढाई – प्रकाश शेंडगे

8 सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात निकराची लढाई – प्रकाश शेंडगे

सांगली – आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात आजपासून धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 8 सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात निकराची लढाई सुरु करणार असल्याचं वक्तव्य धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे. धनगर समाज्याच्या आरक्षणाचा प्रश्न अंदोलनाच्या रूपाने अखेरच्या टप्प्यात आला असून 4 वर्ष देवेंद्र फड़णवीस सरकारला वेळ दिली मात्र आरक्षण देतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नसल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

दरम्यान नवीन निवडणुका आल्या आहेत, त्याची आचारसंहिता चार महिन्यावर आली आहे, त्यामुळे धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देतील ही आशा आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता सरकार विरोधातील रस्त्यावरची लढाई सुरु केली असून 8 सप्टेंबर पर्यंत धनगर समाजाला एसटीत आरक्षण दिल नाही तर देवेंद्र फड़णवीस सरकारचा निषेध व्यक्त करत, 8 सप्टेंबर तारखेपासून सरकारच्या विरोधात निकराची लढाई सुरु करणार असल्याचं शेंडगे यांनी म्हटलं आहे.

असं असणार आंदोलन

* आज महाराष्ट्रभर धरने आंदोलन असणार,

* उद्या प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर आंदोलन असणार,

* 24 तारखेला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा असणार,

 

 

COMMENTS