“प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार”

“प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार”

औरंगाबाद –  भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काही दलित संघटनांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. त्या आघाडीतर्फे राज्यात विविधी ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. काल औरंगाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर हे बहुजन वंचित आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं जाहीर केलं. तसंच ही आघाडी बेरजेचे राजकारण करणारी आघाडी आहे. त्यामुळे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ असंही लक्ष्मन माने यांनी स्पष्ट केलं.

प्रकाश आंबेडकर यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीपर्फे काँग्रेससोबत एकत्रित आघाडीचा प्रस्ताव देणार आहोत. देशभरातील सध्याची राजकीय स्थिती पाहता काँग्रेस आमचा प्रस्ताव स्विकारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच काँग्रेसनं प्रस्ताव स्विकारला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव देणार का ? या प्रश्नावर आमच्या काही अटी असतील त्या राष्ट्रवादीने स्विकारल्या तर त्यांच्यासोबतही आघाडी करु शकतो असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. तर एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याशीही युती होऊ शकते असंही आंबेडकर म्हणाले.

COMMENTS