मुंबई – भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसवर 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. काँग्रेसनं माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले असून त्यामुळे मी काँग्रेसविरोधात ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करत असल्याचं लाड यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा नसून माझी अनेक नेत्यांशी आणि बिल्डर्ससोबत मैत्री आहे. तसेच काँग्रेसच्या आरोपांमध्ये काहीही अर्थ नसून काँग्रेसने माझी नाहक बदनामी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
त्यामुळेच काँग्रेने जमीन घोटाळ्याचे खुसपट काढले –माधव भंडारी
दरम्यान यावेळी माधव भंडारी यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली असून काँग्रेसला टीकेसाठी कोणताही मुद्दा सापडत नाही, या सरकारचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु आहे. त्यामुळेच काँग्रेने जमीन घोटाळ्याचे खुसपट काढले असल्याचं माधव भंडारी यांनी म्हटलं आहे. मुळात ही २४ एकर जमीन कोयना धरण प्रकल्पग्रस्तांपैकी एकूण ९ जणांना वाटप करण्यात आली आहे. सर्वे नंबर १८३ ओवे, नवी मुंबई येथील ही जमीन आहे. हा निर्णय जिल्हाधिकार्यांच्याच पातळीवर होत असतो, त्यात मुख्यमंत्री वा मुख्यमंत्री कार्यालयाचा काहीही संबंध नसल्याचंही भंडारी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे आरोप
नवी मुंबईत सिडकोच्या २४ एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने घोटाळा
घोटाळ्यात मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत
सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे १६०० कोटी मात्र, ती केवळ ३ कोटी रुपयांत विकली
बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकली.
बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे मित्र
तसेच प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी
COMMENTS