मुंबई – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरू आहे. या प्रश्नाला राजकीय रंग देऊ नये. केंद्रात एका पक्षाची सत्ता, महाराष्ट्रात एकाची आणि कर्नाटकात एका पक्षाची अशा प्रकारे भेदाभेद न करता समन्वयाने हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
डॉ. दीपक पवार यांनी लिहलेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद- संघर्ष व संकल्प या पुस्तकाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ह्सेत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्यादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सीमावादावर आपली भूमिका मांडली आहे.
दरेकर म्हणाले, आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. सुप्रीम कोर्ट आपलं शेवटचं हत्यार आहे. सुप्रीम कोर्टासाठी आपल्याला पूर्ण तयारीने आपल्या बांधवाची भूमिका मांडावी लागेल. अंतिम पर्वात उचित असा अनुकूल निर्णय कसा येईल, यासाठी जी काही बुद्धिमत्ता न्यायालयात मांडावी लागेल यासाठी मुख्यमंत्री अधिक लक्ष घातल आहेत ती याची जमेची बाजू आहे. या प्रश्नासाठी महाराष्ट्र एक आहे. विरोधी पक्षदेखील आपल्या सीमाभागीत नागरिकांसाठी सरकारसोबत आहे”, असेही स्पष्ट केले.
COMMENTS