नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांची विश्व हिंदू परिषदेतून हकालपट्टी करण्यात येणार आहे. १४ एपिल रोजी विहिंपच्या कार्यकारी बोर्डाची बैठक होणार असून या बैठकीत तोगडिया आणि विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या जागी या दोन्ही पदावर संघाच्या स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच बैठक घेऊन संघटनेच्या संविधानानुसार निवडणुका घेण्याचे आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विहिंपला दिले असल्याची माहिती आहे.
दरम्यान राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोंडीत पकडल्यामुळेच प्रविण तोगडिया यांची हकालपट्टी केली जात असल्याचं बोललं जात आहे. तसेच विहिंपच्या अध्यक्षपदासाठी संघानं व्ही. कोकजे यांचं नाव सुचवलं आहे. १४ एप्रिल रोजी गुरुग्राममध्ये होणाऱ्या विहिंपच्या बैठकीत कोकजे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS