विहिंपचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका !

विहिंपचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका !

नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला असून विहिंपच्या अध्यक्षपदी सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत. कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल असून तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केलं आहे. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.

दरम्यान तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठीच ही निवडणूक घेण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोंडीत पकडल्यामुळेच प्रविण तोगडिया यांची हकालपट्टी केली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे. तसेच कोकजे यांच्या विजयामुळे त्यांच्या जवळचे मानले जाणार राघव रेड्डी यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे.

COMMENTS