पंतप्रधान मोदींच्या हस्ते हैदराबाद मेट्रोचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते हैदराबाद मेट्रोचे उद्घाटन

हैदराबाद – हैदराबाद मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही मेट्रोसेवा नागरिकांसाठी उद्यापासून सुरू होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसमवेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मियापूर ते कुकटपल्लीपर्यंत मेट्रोतून प्रवास केला.  

पहिला टप्पा नागोल ते मियापूर असा 30 किमीचा आहे. या मार्गावर 24 स्थानके आहेत. दोन किलोमीटरपर्यंत किमान तिकीट दर 10 रुपये असेल व 26 किलोमीटरहून अधिक अंतरासाठी कमाल तिकीटदर 60 रुपये असेल.

तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामा राव यांनी सांगितले की, सुरुवातीला मेट्रो सकाळी6ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू करण्यात येईल. यानंतर प्रवाशांची संख्या आणि मागणी बघून सकाळी 5.30 ते रात्री 11 वाजेपर्यंत ही सेवा करण्यात येईल.  सुरुवातीला तीन डबे असतील. प्रवाशांची संख्या पाहून ही कोचची संख्या वाढवून सहा केली जाईल. एक कोचमधून 330 प्रवाशी एकाचवेळी प्रवास करू शकतील.

COMMENTS