बीड लोकसभा निवडणूक, प्रितम मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे ?

बीड लोकसभा निवडणूक, प्रितम मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे ?

बीड – आगामी लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात भाजपच्या विद्यमान खासदार प्रितम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे असा सामना रंगू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढवणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर धनंजय मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींनी तसा आदेश दिला तर लढवावी लागेल असं म्हटलं आहे. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी तसा आदेश दिला तर बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार प्रितम मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पहावयास मिळू शकतो.

दरम्यान यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी माझी वैयक्तिक इच्छा ही विधानसभा निवडणूक लढवण्याची असल्याचं म्हटलं आहे. परंतु पक्षानं दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य असून जर लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिला तर मी लोकसभा निवडणूक लढवू शकतो असे संकेतही धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

COMMENTS