…त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करावा – पृथ्वीराज चव्हाण

…त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करावा – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – भारतीय अर्थव्यवस्थेवरील संकटामुळे 1 फेब्रुवारीला सादर केलेला अर्थसंकल्प अप्रासंगिक ठरला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.नवीन महसूल प्रवाह, कर आकारणी, कर्ज योजना, प्राधान्यानुसार सुधारित खर्च, विकास आराखड्यात कपात करुन सादर होणाऱ्या बजेटला लोकसभेने मंजूर करणे आवश्यक असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला यापूर्वी नोटा छापण्याचा सल्ला दिला होता. या अडचणीच्या प्रसंगी केंद्र सरकारकडून मिळेल तेवढं कर्ज काढावं लागेल आणि शेवटी केंद्राला नोटा छापाव्या लागतील असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच धार्मिक स्थळांकडून सोनं कर्ज रुपाने घ्यावं. त्यावर व्याज द्यावं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. धार्मिक स्थळांकडून सक्ती करुन किंवा हिसकावून घ्या, असं मी म्हटलं नव्हतं, असं स्पष्टीकरणही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं.

COMMENTS