कऱ्हाड – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे अखेर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभाच लढावी असा आग्रह धरला होता. त्यामुळे पृथ्वीराज.चव्हाण यांनी आज विधानसभा निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे, पृथ्वीराज चव्हाण 3 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
दरम्यान गेली काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण हे साताय्रातू लोकसाभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांना लोकसभेचा विचार न करता आमदारकीच लढविण्याचे सुचविल्यानंतर त्यांनी विधानसभेतच लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे काँग्रेसने पहिल्या यादीत त्यांना स्थान दिले नसले तरी आज जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत त्यांचे कराड दक्षिणमधून नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीकडून उदयनराजेंविरोधात कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS