मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तृतीयपंथी प्रिया पाटील यांनी आज प्रवेश केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. प्रिया पाटील यांना प्रदेश समितीत कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती राष्टेरवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही तृतीयपंथीयांसाठी एक धोरण तयार केले असून प्रिया पाटील यांनी त्यात महत्त्वाचे योगदान दिले असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यभर वेगळी संघटना उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
2014 साली मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु आता मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून मला पक्षात मानाचे स्थान दिल्याबद्दल मी आभारी असल्याचं प्रिया पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रिया पाटील यांनी प्रस्थापित पक्षांची उमेदवारी टाळून अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 166 मधून निवडणूक लढवल होती.
त्यावेळी शहरातील तृतीयपंथी एकवटले आहेत. आता प्रिया पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार..
पक्षाच्या पुरोगामित्वाची साक्ष पटवत तृतीयपंथी प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश.. @supriya_sule@dhananjay_munde @dhananjay_munde pic.twitter.com/Pu2F2MSHY7
— NCP (@NCPspeaks) March 7, 2019
COMMENTS