मुंबई – सनातनवरील बंदीबाबतच्या प्रस्तावावरुन केंद्र आणि राज्य सरकारनं परस्परविरोधी दावे केले आहेत. कालच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सनातनवरील बंदीबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचा दावा केला होता. राज्य सरकारने सनातनवर बंदी आणण्याचा नव्याने प्रस्ताव पाठवलाय. आधीच्या प्रस्तावात तृटी होत्या. नवा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असून विरोधी पक्षांचे आरोप चुकीचे असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच एटीएसनेच सर्व माहिती सीबीआयला दिली असून एटीएसच्या कामगिरीचा सरकारला अभिमान असल्याचं केसरकर यांनी म्हटलं होतं.
परंतु आज सनातन संस्थेवरील बंदीसंदर्भात राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले आहे. एका बाजुला अहिर प्रस्ताव आल्यावर कार्यवाही करु असं म्हणतात तर दुस-या बाजुला राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सनातनवरील बंदीबाबत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये परस्परविरोधी दावे सुरु असल्याचं दिसत आहे.
COMMENTS