दानवेंच्या विरोधात आंदोलन

दानवेंच्या विरोधात आंदोलन

जळगाव : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चार दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त वक्यव्य केले होते. या पार्श्वभूमीवर आज जळगावमध्ये शिवसेनेच्यावतीने दानवे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु आहेत.

जालना जिल्ह्यात कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याची अजब माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवलं असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी शेतकऱ्यांना केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून टिकेची झोड उठली.

दानवेंनी केलेल्या वक्तव्यांच्या निषेधार्थ जळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत, शेण भरवून संताप व्यक्त केला. महापालिकेच्या सतरामजली इमारतीसमोर शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आले.

 

COMMENTS