भाजपच्या पदाधिकारीने केला भाजपच्याच तालुकाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल !

भाजपच्या पदाधिकारीने केला भाजपच्याच तालुकाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल !

पुणे – भाजपच्या तालुकाध्यक्षांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्याच एका ४० वर्षीय महिला पदाधिकारीने भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. देशमाने हे भोर येथील भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत. भाजपा महिला पदाधिकारीने याबाबत भोसरी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली आहे. मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाठवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान देशमाने यांची या महिलेसोबत तीन वर्षांपासून ओळख होती. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून दोघं फोनवरही संपर्कात होते, त्यांचं बोलणं व्हायचं अशी माहिती या महिलेनं पोलिसांनी दिली आहे. परंतु रविवारी रात्री अचानक देशमाने यांनी भाजपा महिला पदाधिकारीच्या मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाठवले. त्यामुळे या महिलेनं त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

COMMENTS