पुणे – महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूजा कोद्रे यांचा विजय झाला आहे. कोद्रे यांना 8 हजार 991 तर शिवसेनेच्या मोनिका तुपे यांना 5 हजार 479 यांना मते मिळाली आहेत. तर या निवडणुकीत भाजप तिस-या स्थानावर गेला असून भाजपच्या सुकन्या गायकवाड यांना 4 हजार 334 मते मिळाली आहेत. यावरून 3 हजार 521 मतांनी पूजा कोद्रे विजयी झाल्या असून त्यांच्या या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गड राखण्यात यश मिळालं आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमध्ये लढत पहायला मिळाल आहे. प्रभाग क्रमांक 22 च्या नगरसेविका आणि माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणुक घेण्यात आली होती.
दरम्यान या प्रभागातील पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चेतन तुपे असल्याने त्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. परंतु मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पॅनेल आणण्यात तुपे यांना यश आले होते. त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळवणं त्यांना सोपं झालं असल्याचं पहावयास मिळालं असून कोद्रे यांचा 3 हजार 521 मतांनी विजय झाला आहे.
COMMENTS