पुणे – मतदारांना साड्या वाटणे भाजप नेते चंद्रकांत पाटलांना महागात पडणार असल्याचं दिसत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महिलांना 1 लाख साड्या भाऊबीज म्हणून वाटणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावर मनसेनं आक्षेप घेतला असून भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी अजून आमदारकीची शप्पथ ही घेतली नाही. ना त्यांना अजून मुख्यमंत्री पद मिळालं. आणि या आधीच एक लाख साडी वाटप करणे हा सरळ-सरळ आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हटलं आहे. याचा अर्थ असा निघतो की निवडणुकी पूर्वी मतदारांना अमिशरूपी साड्या वाटपाचं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं आणि ते आश्वासन ते आता एक लाख मतदारांना साड्या वाटून पूर्ण करत असल्याची टीका मनसेनं केली आहे.
दरम्यान याबाबत मनसे कोथरूड विभागाच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्त तसेच जिल्हाधिकाय्रांकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करत त्यांची कोथरूडमधील निवड ही रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेनं तक्रार दाखल केली तर निवडणूक आयोगाकडून काय तक्रार केली जाणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS