पुणे – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परंतु पक्षांतराचे वारे मात्र अजून सुरुच असल्याचं दिसत आहे. कारण पुण्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी, खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी नगरसेवक आनंद छाजेड, सुधीर जानज्योत, दुर्योधन भापकर यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत विमानतळावर हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सदानंद शेट्टी यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. सदानंद शेट्टी हे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही. त्या नाराजीतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढली आहे.
COMMENTS