पुणे – मराठवाड्याला पाणी देण्यास काँग्रेससोबत आता राष्ट्रवादीचाही विरोध !

पुणे – मराठवाड्याला पाणी देण्यास काँग्रेससोबत आता राष्ट्रवादीचाही विरोध !

पुणे, इंदापूर – उजनी धरणातून मराठवाड्याला बोगद्यातून पाणी देण्याला आता काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनंही विरोध केला आहे. यासाठी आज इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने पळसदेव येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध सभा घेण्यात आली. या सेभेत बोगद्यातुन पाणी सोडण्याला विरोध दर्शवला.

दरम्यान जोपर्यंत उजनीच्या जलाशयात कृष्णेचे पाणी येत नाही तोपर्यंत उजनीचे पाणी सिना नदीत सोडू देणार नाही अशी भूमीका राष्ट्रवादीच्यावतीने घेण्यात आली आहे. तसेच लवकरच या पाण्याच्या वाटपा बाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचे आमदार भरणे यांनी सांगीतले आहे.

COMMENTS