औरंगाबादपेक्षा या जिल्ह्याला संभाजीमहाराजांचे नाव देण्याची मागणी

औरंगाबादपेक्षा या जिल्ह्याला संभाजीमहाराजांचे नाव देण्याची मागणी

मुंबई – राज्यात नामांतराचा वाद वाढत चालला आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून नामांतराची मागणी होत आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे जिल्ह्याच्या नामांतराची मागणी केली आहे. औरंगाबादच्या नामकरणावरून लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा तसा संबंध नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुण्यात आहे. त्यामुळे संभाजी राजे यांचे नाव द्यायचे असेल तर पुणे जिल्ह्याला द्यावे. अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास विरोध दर्शवला. त्यानंतर या विषयावर राजकारण चांगलेच तापले. यामध्ये भाजप व मनसेने शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा देऊन काॅंग्रेसला डिवचले.

दोन दिवसांपूर्वी रिपाईचे नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नामांतरास विरोध केल्यानंतरही बहुजन वंचित आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकरांनी या वादात उडी घेतली. तसेच त्यांनी पुण्याचे नामांतर करण्याचा विषय हाती घेतल्याने राज्याचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

COMMENTS