पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर बंदी !

पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर बंदी !

पुणे – कोल्हापूर पाठोपाठ पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे तसेच डॉल्बीवर बंदी करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मिरवणुकीदरम्यान या आदेशाचं उल्लंघन करणा-या मंडळांचे पदाधिकारी, साऊंड सिस्टिमचा मालक तसेच गाणी वाजवणाऱ्या डीजेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ नुसार ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिरवणूकीत ढोल ताशा वादनाबाबतही काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार एका पथकात ४० ढोल, १० ताशे आणि ६ झांज वादकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. पथकात सर्वजण मिळून १०० जण सहभागी होऊ शकतात. संख्येबाबतच्या मर्यादेचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

COMMENTS