पुणे – खेड येथील शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखर करण्यात आला आहे. रविवारी रात्री रिक्षाची तोडफोड केल्याप्रकरणी चाकण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्यामुळे आमदार सुरेश गोरे आणि त्यांच्या 10 ते 11 विद्यमान नगरसेवकांनी रिक्षांची तोडपोड केली होती.
दरम्यान गेली अनेक दिवसांपासून पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते चाकण दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार गोरे आणि त्यांच्यासोबत काही नगरसेवक रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहतूककोंडी काही केल्या कमी होत नसल्याचा राग त्यांनी अवैध प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षांवर काढला. कायदा हातात घेऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही रिक्षांची तोडफोड केली. त्यामुळे काही रिक्षाचालकांनी आमदार गोरे यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या रिक्षा चालकांकडून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तरी ते कारवाई करत नव्हते. त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागली असल्याचं गोरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS