पुणे – खेड विधानसभेची गणिते बदलणार, रामदास ठाकूर यांनी शड्डू ठोकले !

पुणे – खेड विधानसभेची गणिते बदलणार, रामदास ठाकूर यांनी शड्डू ठोकले !

पुणे – 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चारही पक्षांनी स्वबळावर निवडणुक लढवली होती. त्यामध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सुरेश गोरे यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यात ते निवडणूही आले. त्याच वेळी शिवसेनेकडून रामदास ठाकूर हे इच्छुक होते. मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. 2019 मध्ये तुम्हाला तिकीट देऊ असं आश्वासन ठाकूर यांना दिलं असा दावा ते करत आहेत. त्यामुळे 2014 मध्ये ठाकूरांनी इमाने इतबारे गोरे यांचं काम केलं. आता मात्र विद्यमान आमदार सुरेश गोरे पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तसं त्यांनी जाहीरही केलं आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रामदास ठाकूर यांनी आमदार गोरे यांच्यावर चौफेर टीका केली. त्याचे परिणाम ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

रामदास ठाकूर यांची मतदारसंघात चांगलीच ताकद आहे. 2009 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना जवळपास 41 हजार मते मिळाली होती. आता ठाकूर यांनी कोणत्याही परिस्थिती विधानसभेची निवडणूक लढवणार असा चंग बांधला आहे. मात्र ते आता कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतात की अपक्ष म्हणून यावर यातील गणिते अवलंबून आहेत. भाजपमध्ये विधानसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादीतही माजी आमदार दिलीप मोहिते यांनी तयारी सुरू केली आहे. आघाडीत जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे रामदास ठाकूर यांच्यापुढे एकतर मनसे किंवा अपक्ष असाच पर्याय आहे. आता ते कोणता पर्याय निवडतात ते काही दिवसातच स्पष्ट होईल. एक मात्र नक्की त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील गणिते बलणार आहेत. त्याचा सर्धाधिक फटका शिवसेनेचे सुरेश गोरे यांना होण्याची शक्यता आहे.

COMMENTS