पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. पुणे लोकसभेतही भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित आले असून संभाजी ब्रिगेडकडून भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेसही पुण्यातील जागा संभाजी ब्रिगेडसाठी सोडणार आहे. त्यामुळे संजय काकडे यांना उमेदवारी देऊन काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित पुण्यात भाजपला टक्कर देणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच संभाजी ब्रिगेडने पुण्यातून लोकसभा लढण्याची ऑफर त्यांना दिली होती. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडमध्ये जावून सजय काकडे लोकसभा निवडणूक लढणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS