पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेनेनं लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा अनेकवेळा केली आहे. त्यामुळे भाजपकडूनही राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरु आहे. जर आगामी निवडणूक शिवसेना, भाजपनं स्वतंत्र लढवली तर मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. लक्ष्मण जगताप यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच याठिकाणी मतदारांचा कौल पाहता लक्ष्मण जगताप हे लोकसभेत निवडून येऊ शकतात असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीबाबत अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण केलं आहे. यामध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं मिळतील याचा अंदाज मांडण्यात आला आहे. मावळ मतदारसंघातही भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना भाजपचा पहिला खासदार होण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान जर आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली आणि मावळ लोकसभेची जागा भाजपला सोडली तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे काय निर्णय घेतील याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.
COMMENTS