पुणे – मनसेच्या माजी नगरसेविकेची चौथ्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकी !

पुणे – मनसेच्या माजी नगरसेविकेची चौथ्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकी !

पुणे –  पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकी प्रशसानाला दिली आहे. महानरपालिकेतील विविध विभागामार्फत स्मार्ट संस्थेच्यावतीने काम करीत असलेल्या 230 हून अधिक महिलांना मागील वर्षभरापासून कामावर घेतलं जात नाही. याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील गॅलेरीमध्ये थांबून मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आहे.

दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील विविध विभागामध्ये स्मार्ट या संस्थेमार्फत 10 वर्षापासून ठेकेदार पध्द्तीवर महिला सेविका काम करीत होत्या. मात्र मागील वर्षी या सेविकांचा करार वाढवण्यात आला नाही. त्यामुळे यांना कामावर रुजू करून घेतले गेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून या महिला सेविकांना कामावर घेण्याबाबत अनेक वेळा महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. मात्र याची दखल आजपर्यंत कोणीही न घेतल्याने मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील आणि युगंधरा चाकणकर यांनी महापालिकेच्या इमारतीवर जाऊन शोले स्टाईलने आंदोलन केलं आहे. जोपर्यंत या महिलांना कामावर घेतलं जात नाही तोपर्यंत इमारतीच्या खाली येणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

 

COMMENTS