पुणे – पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. सर्व नगरसेवकांनी एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सर्व 39 नगरसेवकांचा एक महिन्याचा पगार असे आठ लाख रुपये दुष्काळ निवारण्यासाठी मदत म्हणून देण्यात येणार असल्याचं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.यावेळी पालिकेतील विराेधीपक्ष नेते दिलीप बराटे, शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित हाेते.
दरम्यान राज्यात दुष्काळाचं मोठं सावट आहे. या परस्थितीत दुषिकाळग्रस्तांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे याचाच विचार करुन या नगरसेवकांनी आपला एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्तांना देण्याचं ठरवलं आहे. या नगरसेवकांच्या निर्णयामुळे दुष्काळग्रस्तांना आधार मिळणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दुष्काळी भागाचा दाैरा करीत असून दुष्काळाचा आढावा घेत आहेत.
COMMENTS