आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ नेत्यांकडील जबाबदारी काढली !

आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ नेत्यांकडील जबाबदारी काढली !

पुणे – आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठे बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या संघटनेत हे बदल करण्यात आले असून शहरात आक्रमकपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी महिला संघटनेच्या रूपाली चाकणकर यांच्याऐवजी स्वाती पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर युवती संघटनेच्या शहराध्यक्षा मनाली भिलारे यांच्याकडीलही जबाबदारी कमी करण्यात आली आहे.

‘या’ नेत्यांवर नवीन जबाबदारी

दरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्वाती पोकळे यांची तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद महेश हांडे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना विशाल मोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जबाबदारी अश्विनी परेरा, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेसची जबाबदारी अजीम गुडाकुवाला, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेलच्या अध्यक्षपदी समीर निकम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी प्रमोद रणवरे, राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेलच्या अध्यक्षपदी ययाती चरवड,
राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलची जबाबदारी सुकेश पासलकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या अध्यक्षांच्या नावाची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली आहे. पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्याचे तुपे यांनी म्हटले आहे.

COMMENTS