पुणे – नवीन गटनेता निवडीसाठी राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली, ‘यांच्या’ नावाची चर्चा !

पुणे – नवीन गटनेता निवडीसाठी राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली, ‘यांच्या’ नावाची चर्चा !

पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन गटनेत्याची निवड करण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. येत्या मंगळवारी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात याबाबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीला स्वतः अजित पवार यांच्यासह खासदार वंदना चव्हाण, आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, बापू पठारे, अंकुश काकडे तसेच शहर राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याबाबतचं पत्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सर्व पदाधिका-यांना पाठवलं असल्याची माहिती आहे. तसेच गटनेते पदासाठी माजी महापौर दत्ता धनकवडे, बाबुराव चांदेरे, अश्‍विनी कदम, वैशाली बनकर, विशाल तांबे, दिलीप बराटे, सुनील टिंगरे यांची नावं चर्चेत आहेत.

दरम्यान विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विरोधी पक्षनेतेपद बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तुपे हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती आहे. एकाच व्यक्तीकडे दोन जबाबदा-या नको, अशी सूचना पवार यांनी केली आहे. तसेच दरवर्षी गटनेता बदलण्यात यावा असंही शरद पवारांचं म्हणण असल्यामुळे गटनेता बदलीसाठी हालचालींना वेग आला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS