पुणे – पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. टिळेकर यांच्यासह तिघांवर एका कंपनीच्या अधिकाऱ्याकडून ५० लाखांची खंडणी मागीतल्याचा आरोप आहे. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मिलिंद गायकवाड यांनी टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर लगेचच गायकवाड यांची विशेष शाखेत बदली करण्यात आलीय.
वरिष्ठ पातळीवरून सुत्रे हल्ल्यानंतर गायकवाड यांना कोंढव्यातून हलवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान मिलिंद गायकवाड यांनी आज पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रु अनावर झाले होते. पोलीस खात्यात असं दृश्य अपवादानेच पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचीही चर्चा सुरु झाली आहे.
COMMENTS