पुण्यासाठी शरद पवारांनी 2 उमेदवार सुचवले, काँग्रेसमध्ये मात्र तिस-याचीच चर्चा !

पुण्यासाठी शरद पवारांनी 2 उमेदवार सुचवले, काँग्रेसमध्ये मात्र तिस-याचीच चर्चा !

पुणे – आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला आहे. पण काँग्रसकडे तगडा उमेदवार नाही. मोहन जोशी आणि  अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस केंद्रीय समितीकडे करण्यात आली आहे. मात्र भाजपला टक्कर देईल असा उमेदवार काँग्रेसला सापडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दोन उमेदवारांची नावे सुचवल्याची माहिती आहे. या दोन नावापैकी एकाला उमेदवारी द्या असं पवारांनी सुचवलेलं आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांची नावे पवारांनी राहुल गांधी यांच्याकडे सुचवली असल्याची माहिती कळते आहे. या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास आघाडी चांगली लढत देऊ शकते आणि जागा पटकावू शकते असं शरद पवार यांनी सुचवलं आहे. काँग्रेसकडून मात्र याबाबत अधिक काहीही माहिती दिली जात नाही. मात्र काँग्रेसमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये भाजपचे नाराज खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा असल्याचं कळतंय. त्यामुळे पुण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS