पुणे – जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था वाईट असल्यामुळे केंद्र सरकारने वेळीच लक्ष घालून यंदाच्या अर्थसंकल्पात मोडकळीस आलेल्या शाळांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि रोहीत पवार यांनी जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून जावडेकर यांना माहिती दिली आहे.
दरम्यान या शाळांमधील अनेक खोल्या मोडकळीस आल्या असून कोणत्याही वेळी भिंत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच मागील ३ ते ४ वर्षापासून केंद्र सरकारकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी या शिष्टमंडळानं केली आहे.
COMMENTS