सांगली – राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांनी नेहमीच राज्याची सुव्यवस्था अबाधित ठेवली, परंतु आज त्यांच्याच पत्नीवर उपोषणाची वेळ आली असून हे अस्वस्थ करणारे असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. काल तासगावमध्ये हाणामारी झाली त्यासाठी आबांच्या पत्नी सुमनताई आज उपोषणाला बसल्या आहेत. याबाबत अजितदादांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काल तासगावमध्ये हाणामारी झाली त्यासाठी सुमनताई आज तिथे उपोषणाला बसल्या आहेत. ज्यांच्या पतीने, आबांनी नेहमी राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली त्यांच्याच पत्नीला आज उपोषणाला बसावे लागत आहे. हे अस्वस्थ करणारे आहे. #HallaBol #आटपाडी #सांगली #पश्चिममहाराष्ट्र @NCPspeaks pic.twitter.com/d1vpA9vr1I
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 4, 2018
दरम्यान तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणूक प्रचारावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली होती. तलवार, रिव्हॉल्व्हर, काठ्या, गज यांचा हाणामारीत वापर करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी पवार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावेळी पाच पोलिस गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून १०३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील, तर राष्ट्रवादीचे लखन पवार, दिनेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आज तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई या उपोषणाला बसल्या आहेत.
COMMENTS