मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत त्याचे चिरंजीव सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विखे पाटील हे भाजपमध्ये जाणार नसून ते काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सुजय विखे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विखे यांच्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम मिळाला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान भाजपाचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अहमदनगरमध्ये सभा घेणार आहेत. याच सभेत राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता ही केवळ अफवाच ठरली असल्याचं दिसत आहे. वडील काँग्रेसमध्ये असताना मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ही वैयक्तिक बाब आहे.त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही सुजय विखे यांनी म्हटले आहे.
COMMENTS