मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. कारण पक्षापासून दूरावलेले ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विखे पाटील हे भाजपा 12 एप्रिल रोजी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 एप्रिल रोजी सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच विखे यांनी आपण येत्या तीन ते चार दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच विखे यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनीताई विखे पाटील मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपाचे नगरमधील उमेदवार सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे विखे पाटील हे भाजपमध्ये जातील अशी दाट शक्यता वर्तवली आहे. मात्र या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दावा केला आहे.
COMMENTS