मुंबई – काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच काँग्रेसकडून विखे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच नगर जिल्ह्यातील जिल्हा काँग्रेसची सर्व बॉडी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील काँग्रेस सहकाऱ्यांच्या तक्रारी विखे यांच्याबाबतीत आलेल्या आहेत. त्याबाबत तपास करून कारवाई केली जाणार असून विखे पाटील हे पक्षविरोधी कारवाया करत असल्याची तक्रार आमच्याकडे आली असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेंव्हापासुन विखे पाटील हे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु होती. परंतु आज अखेर विखे पाटील यांनी राजीनामा दिला असून राहुल गांधी यांनीहा त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती आहे. त्यामुळे विखे पाटीलही भाजपमध्ये जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
COMMENTS