नवी दिल्ली –जेडीएसचे नेते कुमारस्वामी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. याबाबत कुमारस्वामी यांनी आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाबाबत चर्चा केली असल्याची माहिती असून शपथविधी सोहळ्याला येण्याचं त्यांनी दोघांनाही निमंत्रण दिलं आहे.
दरम्यान यावेळी जेडीएस नेते दानिश अली आणि काँग्रेस नेते वेणुगोपालही उपस्थित होते. तसेच यावेळी सत्तेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असून उपमुख्यमंत्रिपद तसेच अन्य मंत्रिपदांबाबत अंतिम शिक्कामोर्तब झालं नसून उद्या होणाऱ्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS