नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जागावाटप जवळपास निश्चित झालं असून काही जागांवर अजूनही पेच असल्याचं दिसत आहे. नेमकं याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची महत्त्वाची बैठक आज पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तसेच आजच्या या बैठकीत सर्व जागांवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा 4 जानेवारीला झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे. तसंच त्यातील दोन्ही पक्ष आता आपल्या वाट्यातून मित्रपक्षांना काही जागा देणार आहेत. कोणत्या पक्षाला किती आणि कुठे जागा द्यायच्या याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS