मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी यांनी आज मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजेरी लावली. त्यावेळी राहुल गांधी यांनी मी दोषी नाही असे वक्तव्य केले. कोर्टाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी आज जेव्हा मुंबईत दाखल झाले तेव्हा विमानतळावरच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कृपाशंकर सिंह, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरूपम हे उपस्थित होते.
दरम्यान ५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती. यावेळी गौरी लंकेश यांच्या हत्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसणीचा हात आहे या आशयाचं एक ट्विट राहुल गांधींनी केलं होतं. या ट्विटमुळेच त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा संघाने केला.याबाबत आज शिवडी कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीला राहुल गांधी यांनी कोर्टात हजेरी लावली.
COMMENTS