“… तर राहुल गांधींना ब्राम्हण मुलीशी  लग्न करावे लागेल !”

“… तर राहुल गांधींना ब्राम्हण मुलीशी  लग्न करावे लागेल !”

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लग्नविषयी नेहमीच वेगवेगळी चर्चा होत असते. तसंच काँग्रेस त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करेल का असाही प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधान पदावर बसायचं असेल तर त्यांना उत्तर प्रदेशातील ब्राम्हण मुलीशी लग्न करावे लागेल असं वक्तव्य तेलगू देशम पक्षाचे खासदार दिवाकर रेड्डी यांनी केलं आहे. असं केल तरच ते पतंतप्रधान पदावर विचारमान होऊ शकतात असंही रेड्डी यांनी  म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांनाही आपण राहुल यांचे लग्न उत्तर प्रदेशातील ब्राम्हण मुलीशी करावे असा सल्ला यापूर्वी दिला होता असा दावाही रेड्डी यांनी केला आहे. दिवाकर रेड्डी हे आंध्रप्रदेशातील अनंतपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. यापूर्वीत ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसकडून ते तब्बल 6 वेळा आमदार झाले. मात्र गेल्यावेळी त्यांनी टीडीपीमध्ये उडी मारली आणि चक्क खासदार झाले. ज्याला कोणाला देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. त्याला उत्तर प्रदेशातील जनतेचे आशिर्वाद हवे असतात. आणि राहुल यांनी उत्तर प्रदेशातील ब्राम्हण मुलीशी लग्न केलं तर त्यांना ते आर्शिवाद नक्की मिळतील असा दावा दिवाकर रेड्डी यांनी केला आहे.

COMMENTS